Thursday, January 23, 2020

प्रतिकुल परिस्थितीतून शेतकरीपुत्र बनला CA ...!

           प्रतिकुल परिस्थितून शेतकरीपुत्र बनला CA

                     जगण्याची लढाईतही जिथं पोटाची खचखळगी भरण्यात बऱ्याचदा परिस्थितीअभावी भल्याभल्यांची गणितं चुकतात... तिथं रत्नापूर ता.परंडा.जि.उस्मानाबाद येथिल शेतकरीपुत्राने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत CA बनून आपल्या शेतकरी पित्यासह संपुर्ण गावाची अभिमानाने मान उंचावली.

नीलेश मचिंदर यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. नीलेश यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील जयहिंद मचिंदर व आई जमुना शेतकरी आहेत. नीलेश यांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती पवित्राताई दैठणकर शाळेत झाले. पुढील शिक्षण पुणे येथे झाले असून, वाणिज्य शाखेतून पदवी घेतली.

चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा नोव्हेंबर 2019 मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. देशातून अवघे 15 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नीलेश यांनी या परीक्षेत यश प्राप्त केले.

गावाची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल येत्या २६ जानेवारीला रॉयल रत्नापूर, ग्रामपंचायत रत्नापूर,जि.प.शाळा रत्नापूर, तसेच श्रीमती पवित्राताई दैठणकर हायस्कूल,रत्नापूर यांचे तर्फे छोटेखानी सत्कार सभारंभ आयोजित केलेला आहे.

रॉयल रत्नापुर च्या निलेश मचिंदर यांना आमचा मानाचा रॉयल सॅल्यूट...!

Sunday, January 12, 2020

😳 सावधान, बायांचं राज्य येतंय...😳

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

          "आई गं, मेले मी, वाचवा ?
            नका....नका हो मारू मला.मी काय हो असा मोठ्ठा गुन्हा केलाय. का उगाच मला छळता? 

तो: -उगाच, अगं उगाच त्रास द्यायला आम्हाला काय वेड लागलंय होय.... तुझा बाप उरलेलं हुंडयाचे पैसे द्यायचं सोडून दुसऱ्याबी पोरीचं लग्न कराय निघालाय... तुम्हा लोकांना लाडीगोडीत मागितलेलं कळत नाही वाटतं ... साले भिखार औलादीचे.....

ती: - अहो असं काय करताय,कुठून देणार माझे बाबा पैसे... तुम्हाला तर परिस्थिती माहितंच आहे ना...? आधीच ते कर्जबाजारी झालेत होते...

बाई:- ये सुरज, बोलत काय बसलायस ?
        घे तो रॉकेलचा डब्बा... आणि कर सटवीवर रिकामा... लै चुरुचुरु जीभ चालाय लागली काय... आज कायमचीच ब्याद गप्पगार करून टाक...

सुरज रॉकेलच्या डब्याकडे गेलेला पाहून ज्योती धावत देवघरात जाते... सारे दारे खिडक्या आधीच बंद केलेल्या असतात... जीवाच्या आकांताने ती वाचण्यासाठी धावा करते...

        वाचवा ! अहो, कुणीतरी वाचवा मला....
अहो हुंडयासाठी माझे पती, सासू सासरे मला जीवे माराय निघालेत....

अहो, तुमचीही एखादी आई -बहिण असेलच ना... तसंच मलाही समजुन वाचवा ना ?....

परंतु कोणीही पुढे येईना... सारे षंढासारखे खिडकीतून पाहत होते... उलट कांहीनी आपआपले दारे खिडक्या बंद करून घेतल्या.
.
अरे असं अपमानित अपराधी जीवन जगण्यापेक्षा जीव गेलेलाच बरा...
  .
 म्हणतेना तोच ज्योतीच्या अंगावर सुरजने रॉकेलचा डब्बा रिकामा करून काडी टाकून पेटवून दिली....

आगीत ज्योती पेटली... पण तिचं आस्तित्व विझलं...

तिच्या अंगात एवढा आक्रोश होता की  ... जणू त्या आगीपेक्षाही तिच्या उरातली आगच महाभयंकर असावी...

शरीराची राख होईपर्यंत ती त्या देवळातल्या देवाकडे रागाने पाहत होती...

तिच्या समोरच तिचं शरीराची आयुष्यागत राखरांगोळी झाली...

एक मिनिट मी काय म्हणालो...

तिच्या समोरच तिचं शरीराची आयुष्यागत राखरांगोळी झाली...

हे कसं शक्य आहे... ज्योती अजून विझली कशी नाही... तिचा देवावरचा रोष वाढल्याने कदाचित तिला मुक्ती मिळाली नसणार....

आपल्यावरिल अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कदाचित तिचा आत्मा राहिला असणार...

कदाचित तिच्या मुलाबाळात तिचा जीव घुटमळला असणार...

कांही कांहीच कारण समजायला मार्ग नाही... पण एकमात्र समजले. तिचा आत्माच  होता तो.

ति आता देवाला जाब विचारत होती. निष्पापांचा बळी तुझ्यासमोर जात असताना...  दगडाच्या देवाला... दगडाचंच मन असतं... याची तीला प्रचिती आली...

श्रध्देने उपासतापास करूनही आपला जीव गेला... तिचा आत्मा धाय मोकलून रडू लागली...

काय रं देवा... कसला हा न्याय...

स्त्रीला कधीच सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार नाहीयच का?

स्त्रीच्या व्यथा स्त्रीयांलाच माहित असल्याने... म्हणूनच स्त्रीयाही स्त्रीभ्रुण हत्येस सहमती देतात का?

ह्या पुरुषांच्या तावडीतून कधी स्त्रीयांची सुटका होणार...

आजवर आम्हां स्त्रियांच्याच नशिबी काय कर्मभोग आलेत... अन्याय अत्याचार झालेत... होत आहेत...

द्रौपदी, सीते सारखंच आजही घराघरात... गावागावात,वेशीवर, शाळा, कॉलेज,बसस्टॉपवर आणि चौकाचौकात अत्याचार होताहेत...

कधी स्त्रियांचं राज्य येणार...
कधी स्त्रियांचं राज्य येणार...
कधी स्त्रियांचं राज्य येणार...

तेवढयात एक गुढ आकाशवाणी झाल्यासारखा आवाज आला...

           " उठ, मुली, उठ... अशी रडू नकोस. अगं अजूनही मी आहे. जोपर्यंत माणसात,समाजात, विश्वात धर्म आहे तोपर्यंत मी आहे.

आजपासून स्त्रीयांचं राज्य येईल...
आजपासून स्त्रीयांचं राज्य येईल...
आजपासून स्त्रीयांचं राज्य येईल...

                              🌼 क्रमश.....
🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼🏵🌼

Saturday, January 11, 2020

कर्मदरिद्री

हातावरचा फोड फुटला.. तसं त्यातून ओघळणारं नासकं पाणीवजा पु... निघू लागला...

फोड फुटल्यानं राकट हाताला जणू काही भगदाडाच पडल्यावानी दिसू लागलं...

हाथ धुवायला घेतलेलं निरम्याचं पाणी... फोडावाटं काळजात कळ घेऊनच झिरपलं...

काळ्याकुट्ट हातावरली एवढीच ती फोडं... पर कळसूबाईच्या शिखरावानी वाटू लागली... हिमालयातून गंगा उतरावी तसं... या फोडातून पाणी उतरत होतं...

त्यानं ती फोडं कचकटून दाबली... पाणी जसं जसं निघू लागलं... फोडंही ढासळायला लागली... वणवा पेटावा तसा आगडोंब या फोडांनी केला...

"पंच... घ्या तुमचं पैसं... 

म्हणत त्या फोडावर ठेवल्या गेल्या इस्त्री केलेल्या कोऱ्या करकरीत नोटा...

डोळ्यात ढग जमा झालं... तसं त्या नोटांवरच सरी कोसळू लागल्या...

डोक्यावर अन् पाठीवर हाथ फिरवणारं कोणीच नव्हतं त्याचं...

पोटासाठी हात पसरविण्यापेक्षा... हात कष्टाच्या कामासाठी जोडणं बेहत्तर... स्वाभिमानानं त्यानं पोटावर हात न ठेवता... हातावर पोट भरु लागला...

गठाडं खंदून-खंदून अंगातली समदी ऊर्जाच गेली... भुकेनं पोटात कावळं ओरडायला लागली...

तसाच तो तिडकीनं बोळातल्या इराणी खाणावळीत शिरला... हाफ प्लेट बिर्याणी अन् एक संत्रा देशीची बाटली घेतली...

मटण लई आवडायचं त्याला... तो पैसं आलं की न चुकता हाफ प्लेट बिर्याणी खाणार म्हणजे खाणारच...

घोट-घोट करत बाटली संपली. तशी त्या कोरी नोटीची इस्त्रीही चुरगाळून गेली...

अडखळत कशीबशी घराकडची वाट धरली...

Thursday, January 9, 2020

मिस्टर जावईबापू सासरवाडीकर

"मिस्टर जावईबापू सासूरवाडीकर", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/dt0nklcngohq?utm_source=android&utm_campaign=content_share
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
______________________🙏____________________

बरं, मंडळी...
पोरगी बगाय चाललोय, आशिर्वाद द्या...( हनुमंत आशिर्वाद घेण्यासाठी वाकतो)

अरं रं रं... माझं हे असंच व्हतं बगा... "जरासं वाकलं की , आलीच कळ...?

तवा तुमी जरासं डोळं बंद करा...
मी थोडं परसाकडं बसतो.

हानु परसाकडं बसणार तोच, फोन येतो( कर्कश: भुताची किंचाळी असलेली रिंगटोन असते) हा भुतss भुत म्हणत पळतो. ( इजार पकडत).

हानु 👉 च्यायला, फोन वाजतोया व्हंय...
          हालावं, हानु मंतराव पिकिंग....

बाजीराव 👉 काय राव पाव्हणं... कधी येणार हायसां तुमी... वाट बगत्यात सम्दी... लौकर या.... बरं कोण कोण आलैसा...

हानु 👉 म्या... एकलाच आलोया बगा मामंजी... पर मामंजी तुमाला कुणी दिला वं माझा बाईल लंबर.... अजून माझ्याकडंबी नाही... आन् तुम्हाला कसा बाँ पोचला ...

बाजीराव 👉 आरंय गाढवा... हे नाटक हाय काय बी नकु... वाढीव डैयलोग जोडू... ओ हानुमंतराव लौकर या...

(फोन ठेवला जातो)

हानु👉तर मंडळी हयो माझा व्हणारा  कासरा ते आपलं सासरा बरं का... स्वतःले लै शाना समजतो... मागल्या बारी घरी आलता तवा सारकाच बोंबाईल काढायचा... आन् त्यातली आराध्याची गाणी लावायचा... मग म्याबी घेतला त्याच्या उरावर बोंबाईल... च्यायला आताच घेतलाय... पर समजाना बबा... हिरवं फोन लावाय आन् उचलाया... लाल बंद कराया... एवढंच माहित हाय...

( समोर एक स्त्री उभी असते)... याच आपलं हिरवं लाल बटणांविषयी चालूच.... हा मोबाईल तिच्या समोर धरतो... आणि बडबडतच राहतो...

( दोघेजन दुरुन पाहत असतात. )

आज्या, आरं ह्यो बग कुणी बाप्प्या... आपल्या गावच्या बायांची फोटू काढतोया...

चल साल्याला चांगलाच धुऊन काढू...( दोघेही त्याला बेदम मारतात).

हानु 👉 आवं वो... पर म्या केलंया तरी काय... मला का इनाकारण मारताया...

आज्या 👉 भाडया , गावच्या बायांचे फोटू काढतोयस व्हंय... थांब आता तुझा भिंतीवर फोटू लावतो... मग बस म्हणावं घरच्यांना हार बदलीत...

ये, महया... मोबाईल घी त्याचा आधी...

महया 👉 (मोबाईल घेतो... अन बघतो तर काय मोबाईलला कॅमेराच नसतो.)

आज्या...आरं मोबाईलला कॅमेराच नाय रं...

हानु 👉 हाणा... हाणा गरिबाला ... अजुन हाणा...
काय रं... तुमच्या गावात पाव्हण्यांला हाणायची पध्दत हाय काय म्हणायची... चांगला पोरगी बगाय निघालो व्हतो... आता पार लंगडा केला...आगं आय आय... लगीन व्हऊस्तर बी दम नव्हता कारं मुडद्यांनो....

अज्या- महया ( सॉरी सॉरी... पाव्हणं चुकी झाली बगा... )

हानु 👉 हाँ सॉरी... काय सॉरी... पैले क्यों मग झक मारी...
मारी तर मारी... पण तोडी कायकु बरगडी...

अज्या 👉 कुणाकडं आलासा पाव्हणं...

हानु 👉 बाजीराव सदा डुकरे ह्यांची पोरगी बगाय आलोया...

महया 👉 आँss म्हंजी तिच की...

हानु 👉 कंची हो...

अज्या 👉 काशाबाय...

😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟
  
क्रमश:

Wednesday, January 8, 2020

२६ जानेवारी

🌸❄🌸🍁🌸🍁❄🌸❄🍁🌸

                #माझी_सौविस_जानेवारी ... 
      

' कारं सुल्या एवढया फाटं उठलास', साला तर धा वाजता भरतीया नवं ...

'व्हय गो माय '
पर आज सौविस जैनिवरी हायेना . लौकिर जावा लागंल सालात ... झेंडावंदिन हाय .

''#परजातंतर_दीन''

"म्हंजी रं ' ?

आगं' म्हंजी माझ्या सिवाजी राजानं लोककल्याणासाठी लोकराज्य म्हणजीच स्वराजे निरमान केलं... बा भिमानं खऱ्या अरथानं लोकांच्या हाती देऊन ... लोकशाही राज्य बनवलं तो दिवस ...

राजंशाही , हुकूमशाही . माणसांली जनावरागत मिळणारी वागणूक देत व्हती .. बायाबापडयावं व्हणारं अत्याचार ... सुद्र .. भेदाभेद ... जातपात ... समदं काय सोडून गुणागोविंदानं ऱ्हयाण्यासाठी केलेला कायदा .. आज अंमलात आणून ... #गुलामाला_राजा_केल्याचा_दिवस ...

म्या पाठ केल्यालं भासान आयडी पुढ सांगाय लागलो ...

गुलामास्नी राजा बनविल्याचा दिस... माणूस सणासारखा साजरा करायचा दिस...

दिस म्हण्जी .. ? दिस म्हणल्यावर निवद बिवद दाखवावं लागंल कै रं ...

म्या कप्पाळावं हात मार्ला ...
या आयडीला समजीवनं लै यडया गबाळयाचं कामंय बगा ...

आगं आयडे , निवद अस्तुया व्हयं गं ... आगं

"मंग पोळ्या करावं लागत्याल कै ..?

चला हिच्या आडमुटे पणाला अंत नै ...

कर .. कर तु पोळ्या माय ... साडे सा वाजले मला उशिर व्हतोया म्या जातु ...

मायी आयडी ना लै येडी है ... कळत तं कैच नै ... पर आव लै आणणार ...
पर बा गेल्यापास्नं मला आन शालीला लै जप्लं ... समदा गाव कौतुक करतुया...

बा गेल्यापास्नं तिच आमचा मायबाप झाली ... मजूरी करुन जगीवती ...

#डोस्कं_कुटं_कसं_चालवावं_हे_जरी_तिला_जमत_नस्लं_तरी_पॉट_कसं_भरायचं_हे_तिला_चांग्लंच_ठाऊकै ...

म्या लौकर उठूनश्यानी आलूया खरा पर कोनच दिसाना ... म्हंजी उशिर झाला कै ...

धापा टाकित आलो ... राम्या आजूनश्यान पारुसाच कसा रं ... आरं साळात नै का याचं ...

ये ... सुल्या गोऱ्या मास्तरानी सुट्टी दिलीया .. आन् तु एकलाच जाणार व्हय ...

म्या त्याचं पुढचं यैकलंच न्हाय ... तडक साळा गाठली ...

खरंच बोलला राम्या ... चिटपाकरु बी न्हाय ...

अण्णा सिपाई तेवडा दिसला ...
म्या त्याला इचारलं ...
''अण्णा मामा .. झेंडावंदन न्हाय ...

तिकाय फडकतोय की .. ' म्हणत झेडयाकं अण्णा मामा नं बॉट केलं ...

न्हाय म्हंजी समंदी न्हाईत आली ... मास्तरं ... इद्यार्थी ...

येडा का खुळा रं सुल्या ... तु ...

आरं सुट्टीच्या दिशी कोण येतं कै ... रोजच्याला तु सोडला तर वर्गात आसतय का कुणी ...

पर सविसजैनुवारी चं कै अण्णा मामा ...

म्या भासन लिवलं व्हतं ... डाक्टर बाबासैबावं ...

ये सुल्या , कै बारक्या पोरावानी रडूतुसा ...

#येडया_समंदी_सुट्टीचा_दिस_भोगत्यात_आपआपल्यापरीनं ...
(खिशातून हातभट्टी काढत .. )

' #म्या_बी_गेलू_असतू_घरी ... #पर_हया_झेंडयाला_राखण_बसायची_येळ_आली_रं ...

कुत्र्यागत पेताडा अण्णा मामा ... कंलडत झेंडयाजवळ बस्ला ...

वारं वा ... सिवाजीचा मावळा ... बाबासैबाचा भिमसैनिक ... शुरइरांची हिच का पैदाइस ...

बरं व्हतं दुसराच्या पारतंतर्यात त्याच्या जुलूमाला इरोद करणारी मर्दाच्या अवलादी तरी जल्मायच्या ...

स्वातंतऱ्यात जर आसली हिजडीच पैदास व्हणार ... आसतील तर काय उपयोग ...

ये किडया ... कुणाला हिजडा म्हणतूस ... च्यायला ... कडू बेनं लैच बोलाय सिकलंय ...

कुणाला पिसाळं कुत्रं चावलंत ... तवा या पारध्यास्नी सिकवायला निघालं ... आज आमास्नी हिजडं म्हणत्यात ... सिकून मुतायलास भाडया ... तोंडात ... आमच्या ...
चल हाड कुत्र्या ... न्हाय तर डोस्कंच फोडीन ....

अण्णा मामा केकालला ... म्या तितन निगून आलू ...

#गाडवाला_गीता_समजना ... #बा_भिमाचं_संविधान_कै_समजायचंय ...

म्या घरी आलू ... घराला कुलूप ... आयडी कामाला गेली वाटतं ... #समद्यांस्नी_सुट्टी_मिळती ...

#पर_त्या_सिमेवरच्या_जवानाला ... #आणि_माया_आयडीला_कवाच_सुट्टी_नाय_मिळत ...

रकमाये ... आयडी कुणाच्या शैतात गेलीया ... तुये ठावैका ...

आरं त्या जनीबरं गेलीया वाटतं ... गंप्याच्यात ...

म्या ... बांधानं चालत आलू आयडीला हाका मारित ... वरनं मिलीटरीच इमानाचा आवाज आला ...

मलायना जन्मापास्न लै याडं है मिलटरीचं ... माझं सपानच है ते म्या बी इक दिस जाईन .. अंसं स्वताशीच बोलत व्हतो ..

तेवढयाच बांदाऊन चालताना पाय घसरला . नेम कारीचा काटा घुसला पायात ...समंदाच्या समंदा  आरपार ...

आये ... गंsssss

माझा आवाजानं जनाक्का आयडी .. समदी पळत आली ...

''सुल्या कै झालं लेकरा ...
आगां बया किती रगात व्हातंया ..

कशाला कलमडला व्हतास ... घरीच खपैच ना .. निवळ औचिंद है ... पॉर ...

देवा ... कै करू आता ...

ये वंदे ... गप बैस ... रडू नगंस भेदरंल ... पॉर ...

आगं ... भूक लागली आन तू चावी कुटं ठिवली आज घराची ... म्हणून आल्तो ... पर तूला तर काम नव्हती की आज ... तु कशी आली ... आजारी असतानी ...

काळ्या ... तुच म्हणालासा की आज कसलासा सणसुद है म्हून ...

घरात पिठाची चिमूट नव्हती ... आन् तुला तं माहितय #माह्या_लेकरांनी_सणासुदीला ... #दुसऱ्यांच्या_तोंडाकं_बगातल्यालं ... #मला_आवडत_नै_म्हणून ...

#माझी_आयडी ... #सविस_जैनवारीला_सण_समजतीया ...

मला रडू कोसळलं ... तिनं पदरानं आसवं पुसली ... #आज_माझ्या_आयडीचा_पदर_मला_तिरंग्यावानी #फडकल्यासारखा_वाटला ...

म्या ... माझ्या भारतमातेला ... सलाम ठोकला ... मिलिटरीत ठोकत्यात ना एकदम तसाच कडक ....

✒ #सुमित_रवि_सरवदे .
    ( नवोदित लेखक / कवि )
    
         🌸🍁❄🍁🌸🍁❄🍁🌸🍁❄


माझी चित्रकथा